या जगात दोन टाईपची लोक असतात,
जी डोळ्यात स्वप्न घेऊन जगतात, आणि काही डोळ्यात स्वप्न खूपसून जगतात!
मला या स्वप्न खूपसलेल्या डोळ्यांचा लई (खूप) हेवा वाटो बघा!
ते असो! पण डोळ्यातली स्वप्न आज काल डोळ्यातच राहतात!
बरचसं आयुष्य पोरगा किंवा पोरगी पटवण्य़ात निघून जातं! मगं त्यानंतरचा वेळ त्यांची दिशाभूल करण्यात नाहीतर त्यांचे चोचले पुरवण्यात जातो! बरं मग आता हे चोचले वगैरे पुरवून झाले की मग, त्या नाजूक किंवा त्या आडदांड हि-याबरोबर सेटल होण्याचे वेध लागतात. सेटल होण्यासाठीचा उतावीळपणा तर अगदी व्हिडीयोशूट करण्यासारखा फिल्मी असतो! कशीबशी पैशाची कसरत करून थोडी जमापुंजी जमा केली की लाजेखातर एक मोठ्या लगीन-सोहळ्याचा थाट करा! आणि मग ‘नव्याने सुरूवात’ करावी लागते सगळ्याची! आई गं!!! हिमतीला दाद द्यावी म्हणावं! मग थोडी आणखी हिम्मत करून- ब्रॅन्जेलिना म्हणा, नाहीतर अॅशअभी म्हणा नाहीतर, तुमच्या माझ्यासारखे नवरा-बायको ‘फिरायला’ जातात! फिरून आल्यावर वर्षभरात काम आटपून मूला-बाळांच्या तयारीला लागतात! आणि मग मूल-बाळ झाली की परत इतर-तुमच्या-माझ्या आई-बाबांसारखं नरडा दुखे पर्यंत त्या पोरांच्या मागे ओरडत राहतात! आणि हो! आपल्या ‘भूत-कृत्याचा’ आढावा तथा पश्चाताप करतात.
पण हे सर्व होण्याआधी समजात एक इंटरेस्टींग जात आहे, जी केवळ इथे बघ्याची भूमिका करतात! म्हंजे मैत्रिणीच्या लग्नात मेहंदी काढा, मैत्रिण आणि तिच्या मित्राची अतिबालिश भांडण सोडवा, मित्राच्या गलफ्रेंडला बहीण माना, किंवा मित्राच्या लग्नात पोरी पटवण्याचा अपयशी प्रयत्न करा, किंवा आपल्याला अतोनात आवडणा-या मुलाच लग्न अटेंड करा! जाउ दे....जास्त बोलत नाही उगीच डोळ्यात पाणी येईल!
तर मी म्हणत होते की आज काल बराचसा वेळ हा नाती बनवण्यात आणि पुढे ती टिकवून ठेवण्यातच निघून जातो. खासकरून बराचसा वेळ हा, उत्तम प्रियकर शोधण्यात आणि नंतर उत्तम प्रियकर बनण्यातच निघून जातो! काय म्हणाव याला!
No comments:
Post a Comment